Coronavirus : जिल्ह्यात आज तीन हजार २८० रुग्णांची नोंद

Coronavirus : जिल्ह्यात आज तीन हजार २८० रुग्णांची नोंद

नगरसह दहा तालुक्यात १०० हुन अधिक रुग्ण

अहमदनगर | Ahmednagar

नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा कहर वाढत आहे. करोना प्रतिबंधासाठी अनेक उपययोजना लागू केलेल्या असल्या तरीही आकडे वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३ हजार २८०इतके करोनाबाधित आढळून आले आहे. नगर शहर व ग्रामीणसह, राहाता, कर्जत या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ७९८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८०८ आणि अँटीजेन चाचणीत १ हजार ६७४ रुग्ण बाधीत आढळले

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

नगर मनपा - ८८७

नगर ग्रामीण - ३४१

राहाता - २८०

कर्जत - २३६

श्रीरामपूर - १८९

राहुरी - १८६

संगमनेर - १८४

शेवगाव - १६४

कोपरगाव - १५२

अकोले - १३७

पारनेर - १०१

पाथर्डी - ९८

नेवासा - ९५

कॉंटेन्मेन्ट - ६८

इतर जिल्हा - ५५

जामखेड - ४८

श्रीगोंदा - ४६

मिलिटरी हॉस्पिटल - १३

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com