दूध डेअरीवर राहुरी तहसीलदारांची दंडात्मक कारवाई

दूध डेअरीवर राहुरी तहसीलदारांची दंडात्मक कारवाई

राहुरी l Rahuri

जिल्ह्यासह राहुरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

दरम्यान, तालुक्यातील सात्रळ, धानोरे, सोनगाव परिसरात करोनाचे थैमान सुरु असताना दूध विक्री करतांना करोना नियमांचे पालन न केल्याने सात्रळ दूध डेरीवर डेअरीवर तहसीलदार शेख यांनी दंडात्मक कारवाई केली आहे. तहसीलदारांनी सात्रळ परिसराला भेट देऊन अनेक दुकानदार तसेच अवैध व्यवसायाच्या ठिकाणी भेटी देऊन दंडात्मक कारवाई केली.

यावेळी तहसीलदारांनी सात्रळ दूधचे मालक दिलीप गागरे यांना खडेबोल सुनावले. तहसीलदार शेख म्हणाले कि, 'आज गरीब जनता करोना महामारीमुळे संतप्त झाली असून तुम्हाला तुमचा धंदा प्रिय आहे. शासनाने नियमाचे बंधन घालून देखील तुम्हाला त्याचे कोणतेही गांभीर्य नाही ही शोकांतिका आहे. येथून पुढे असेच जर तुमचे कृत्य चालले तर शासन निर्णयानुसार तुमच्या डेरीवर मोठी कारवाई करण्यात येईल.' असा इशारा त्यांनी दिला आहे.

करोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन काल सात्रळ धानोरे सोनगाव परिसरात काल भेट दिली असता सात्रळ येथील सात्रळ दूध डेअरीच्या दूध सेंटर वर भेट दीली असता मोठी गर्दी आढळून आली. तसेच या डेरी मालकाने सॅनिटायझर व करोना संदर्भातील कोणतेही काळजी घेताना दिसली नाही. त्यामुळे त्यांच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई केली आहे.

तहसीलदार शेख, राहुरी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com