Photo : सावेडीत पुन्हा भरला भाजीबाजार; नागरिकांची झुंबड

Photo : सावेडीत पुन्हा भरला भाजीबाजार; नागरिकांची झुंबड

पोलीस, मनपा प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

अहमदनगर|Ahmedagar

सावेडी उपनगरातील एकविरा चौकात आज पुन्हा भाजीबाजार भरला.

सोमवारी सकाळी भाजी बाजार भरल्यानंतर काल सायंकाळी मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी आदेश काढून फक्त घरोघरी भाजी विक्रीला परवानगी दिली होती.

परंतु मनपा आयुक्तांनी काढलेले आदेश कागदावर असल्याचे चित्र आज सकाळी पाहायला मिळाले.

दरम्यान, गर्दी झाल्याची माहिती तोफखाना पोलीस, मनपा प्रशासनाला मिळताच त्यांनी एकविरा चौकात धाव घेतली.

सकाळी दोन तासांपासून झालेली गर्दी हटविली. भाजी विक्रीसाठी बसलेल्यांना पोलीस व मनपा प्रशासनाने प्रत्येकी ५०० रुपये दंड केला.

7 ते 11 रस्त्यावर गर्दी

करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदीची नवीन नियमावली जाहीर केली. जनता कर्फ्यूचेही आवाहन केले. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 यावेळेत सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली लोकांनी रस्त्यावर गर्दी केल्याचे चित्र सोमवार, मंगळवार नगर शहरातील रस्त्यावर दिसले. मोठ्या प्रमाणात होत असलेली गर्दी करोनाचा धोका अधिक गडद करणारी आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com