करोना : नगर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.03 टक्के

आज 170 रूग्णांना डिस्चार्ज तर 99 नवे रुग्ण
करोना : नगर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.03 टक्के

अहमदनगर -

जिल्ह्यात आज 170 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 67 हजार 226 इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण (रिकव्हरी रेट ) हे आता 97.03 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 99 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 1013 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 39, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 46 आणि अँटीजेन चाचणीत 14 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 12, अकोले 06, जामखेड 01, कर्जत 04, कोपरगाव 02, नगर ग्रामीण 02, नेवासा 02, पारनेर 03, संगमनेर 02, शेवगाव 02, श्रीगोंदा 01, मिलिटरी हॉस्पिटल 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 18,अकोले 02, कर्जत 01, कोपरगाव 03, नगर ग्रामीण 01, नेवासा 03, पारनेर 08, राहाता 04, संगमनेर 04, श्रीरामपूर 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 14 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, कर्जत 02, कोपरगाव 05, नगर ग्रामीण 03, श्रीरामपूर 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा 45, अकोले 05, जामखेड 01, कर्जत 05, कोपरगाव 16,, नगर ग्रामीण 06, नेवासा 02, पारनेर 06, पाथर्डी 19, राहाता 15, राहुरी 03, संगमनेर 20, शेवगाव 04, श्रीगोंदा 02, श्रीरामपुर 06, मिलिटरी हॉस्पिटल 09 आणि जिल्हा बाहेरील 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:67226

उपचार सुरू असलेले रूग्ण: 1013

मृत्यू:1048

एकूण रूग्ण संख्या:69287

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com