Photo : नेवासा शहरात पोलीस व प्रशासनाचा 'रूट मार्च'

Photo : नेवासा शहरात पोलीस व प्रशासनाचा 'रूट मार्च'

नेवासा | तालुका वार्ताहर

नेवासा तालुक्यात करोना रुग्णांच्या संख्येत झपाटीने वाढ होतं आहे. या पार्श्वभूमीवर नेवासा पोलिसांनी व महसूल विभागाने शहरातील विविध भागातून बुधवारी सकाळी पोलीस व महसूल प्रशासनाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला. शहरातील मुख्य भागामध्ये हा रूट मार्च काढण्यात आला.

करोना काळात सूचनांचे नागरिकांनी पालन करावे तसेच पोलीसांना नागरीकांनी सहकार्य करावे अश्या सूचना या वेळी आधिकारी यांनी दिल्या. यावेळी प्रांत आधिकारी गणेश पवार, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, पोलीस निरीक्षक विजय करे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल व पोलीस कर्मचारी या रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते.

करोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आपली व कुटुंबातील सदस्य यांची काळजी घ्यावी व पोलीस व महसूल प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे.

पोलीस निरीक्षक विजय करे

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com