श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

श्रीरामपूर तालुक्यात काल उच्चांकी 134 रुग्ण सापडले आहे. तर 546 रुग्ण अॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये

उपचार घेत आहेत. शहरात 91, तालुक्यात 39 रुग्ण काल आढळून आले तर 55 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात काल 134 करोना बाधीत रुग्ण सापडले आहे. जिल्हा रुग्णालयात 21 खासगी रुग्णालयात 74 तर अॅन्टीजन तपासणीत 39 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 55 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 546 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 1244 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 596 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 546 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

शहरात - 91, ग्रामीण भाग- 39, बाहेरील तालुका -4 असे एकूण - 134 रुग्ण आहेत. यात टाकळीभान-02, खंडाळा-01, बेलापूर-03, दत्तनगर-01, गोंडेगाव-03, कारेगाव-01, मालुंजा-01, मातापूर-01, रामपूरवाडी-02, निपाणीवडगाव-02, भोकर-01, शिरसगाव-01, निमगाव खैरी-01 असे 39, तर श्रीरामपूरात 60, वॉर्ड नंबर-1-08, वॉर्ड नंबर-3- 03, वॉर्ड नंबर- -6-09, वॉर्ड नंबर-7-11 असे 91 रुग्ण आढळून आले आहेत. तर बाहेरील तालुक्यातील 04असे काल एकूण 137 रुग्ण आढळून आले आहेत. सध्या श्रीरामपूर शहरात 278 रुग्ण उपचार घेत असून यात आंबेडकर वसतीगृहात 73, ग्रामीण रुग्णालयात 40 अन्य खासगी डॉ. शुक्ला, डॉ. मोरगे, संजीवनी हॉस्पिटल, साई शितल कोविड सेंटर, युनिटी हॉस्पिटल, अल्फा हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात 165 असे एकूण 278 कोविड रुग्ण उपचार घेत आहेत.