राहाता (तालुका प्रतिनिधी) -

ऱाहाता तालुक्यात करोनाचा मोठा उद्रेक झाला. दिवसभरात 208 जणांना करोनाची लागण झाली असून शिर्डी व राहाता

करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. शिर्डीत 56 तर राहात्यात 36 रूग्ण आढळून आले आहे.

करोनाचा कहर राहाता तालुक्यात सुरूच असून रोजच रूग्णांची संख्या वाढत आहे. राहाता शहर लॉकडाऊन करूनही रूग्णसंख्या कमी होत नाही. दिवसभरात 208 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालात सर्वाधिक 56 करोना रूग्ण शिर्डीत सापडले तर राहात्यात 36 रूग्ण, लोणीत 15, कोल्हार 9, साकुरी 13, सावळीविहीर बु. 15, निमगाव 4, प्रवरानगर 4, रामपुरवाडी 3, केलवड 3, दाढ 3, एकरुखे 3, निर्मळ पिंप्री 3, वाकडी 2 असे 38 गावांत कोरोनाने आपले पाय पसरवले आहे.

गेल्या महिन्यापासून शिर्डी व राहाता शहरातील करोना बाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली जात असून आरोग्य प्रशासन मोठे प्रयत्न करूनही रूग्णसंख्या वाढत असल्याने त्यांची चिंता वाढत चालली आहे. राहाता व साकुरी दोन्ही गावे 30 तारखेला लॉकडाऊन केली असताना रूग्णसंख्या वाढत असून काल साकुरीत 13 रूग्ण सापडले असताना व्यापार्यांच्या दबावामुळे साकुरी ग्रामपंचायतीने लॉकडाऊन शिथील करत दुपारी दोन पर्यंत व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली कशी, असा सवाल नागरीक विचारत आहे.

साकुरी लॉकडाऊन करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सूचना

राहाता व साकुरी दोन्ही लगत गावे असून एक बंद तर दुसरे चालू करून उपयोग होणार नाही, असे सांगत गटविकास अधिकारी यांना साकुरी बंद ठेवण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी राहाता नगरपालीकेत झालेल्या बैठकीत दिल्या.