नेवासा तालुक्यात 14 गावांतून 27 करोनाबाधित

देवसडे येथे सर्वाधिक 5 संक्रमित
करोनाबाधित
करोनाबाधित

नेवासा (का. प्रतिनिधी) -

नेवासा तालुक्यात काल 14 गावांतून 27 करोना संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या

2046 झाली आहे. काल सर्वाधिक 5 संक्रमित देवसडे येथील आढळून आले.

सोनई येथे चार तर कुकाणा येथील तिघे करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. भेंडा बुद्रुक, चिलेखनवाडी, गणेशवाडी व नेवासा खुर्द या चार गावांतून प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले.

भालगाव, कौठा, लोहगाव, नजिकचिंचोली, नेवासा बुद्रुक, पाथरवाला व उस्थळदुमाला या सात गावांतील प्रत्येकी एकजण संक्रमित झाल्याचे चाचण्यांतून दिसून आले. अशाप्रकारे तालुक्यातील 14 गावांतून 27 संक्रमित आढळून आल्याने तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या 2046 झाली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com