करोना
करोना

कोपरगावात 18 करोना संक्रमित

22 रुग्ण करोना मुक्त

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) -

कोपरगाव शहरासह तालुक्यात 5 ऑक्टोबर रोजी सापडलेल्या 17 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 144 व्यक्तींची रॅपिड टेस्ट

करण्यात आली. त्यात 14 रुग्ण तर अहमदनगर नगर येथे पाठवलेल्या रुग्णांपैकी 2 तसेच खासगी लॅब मधील 2 रुग्ण असे 18 रुग्ण पॉझिटिव्ह आले. 22 रुग्ण करोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे काल दिवसभरात एकूण 18 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहेत. त्यात शहरातील संभाजी चौक येथील 1,रचना पार्क येथील 1,खडकी येथील 1, धारणगाव रोड येथील 1, गुलमोहर कॉलनी येथील 2, तर ग्रामीण मधील पोहेगाव येथील 1, वारी येथील 2, माहेगाव देशमुख येथील 2, कोळपेवाडी येथील 1, येसगाव येथील 2, कोकमठाण येथील 1, मंजूर येथील 3 असे आज दिवसभरात एकूण 18 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे. तर 22 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोपरगाव तालुक्यात आज 6 ऑक्टोबरपर्यंत एकूण एक हजार 938 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 83 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत तसेच एक हजार 820 रुग्ण बरे झाले आहे. तर आजपर्यंत एकूण 9 हजार 622 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांचे प्रमाण 20.14 टक्के आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.80 टक्के असे आहे. तर 35 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com