जिल्ह्यात 1 हजार 38 करोना बाधितांची  भर
सार्वमत

जिल्ह्यात 1 हजार 38 करोना बाधितांची भर

पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 48 हजार 347 मृतांची संख्या 750

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

अहमदनगर (प्रतिनिधी) -

गेल्या काही दिवसांपासून कमी झालेल्या करोना बाधितांची रुग्णांची संख्या बुधवारी अचानक 1 हजार 38 वर

पोहचली. आरोग्य कर्मचार्‍यांनी कालपासून अहवाल बंद आंदोलन मागे घेतल्याने पुन्हा काम सुरू केल्याने करोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान करोना बळींची संख्या देखील 750 वर पोहचली असून बाधितांचा एकूण आकडा 48 हजार 347 वर पोहचला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 43 हजार 497 रुग्णांनी करोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.97 टक्के इतके झाले आहे. तर बुधवारी उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 4 हजार 100 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 140, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 534 आणि अँटीजेन चाचणीत 364 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 48,अकोले 8, जामखेड 17, कर्जत 1, कोपरगाव 5, नगर ग्रामीण 19, पारनेर 4, पाथर्डी 1, राहाता 5, संगमनेर 6, शेवगाव 8, श्रीगोंदा 2, कँटोन्मेंट 1, मिलिटरी हॉस्पिटल 14, इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 534 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 135, अकोले 31, जामखेड 5, कर्जत 2, कोपरगाव 9, नगर ग्रामीण 57, नेवासा 25, पारनेर 18, पाथर्डी 9, राहाता 50, राहुरी 35, संगमनेर 110, शेवगाव 19, श्रीगोंदा 12, श्रीरामपूर 17 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 364 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा 44, अकोले 5, जामखेड 20, कर्जत 26, कोपरगाव 12, नगर ग्रामीण 19, नेवासा 22, पारनेर 11, पाथर्डी 32, राहाता 37, राहुरी 36, संगमनेर 37, शेवगाव 10, श्रीगोंदा 21, श्रीरामपूर 30, कॅन्टोन्मेंट 2 अशा रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 119, अकोले 21, जामखेड 37, कोपरगाव 27, नगर ग्रा. 67, नेवासा 46, पारनेर 22, पाथर्डी 22, राहाता 59, राहुरी 48, संगमनेर 56, शेवगाव 26, श्रीगोंदा 28, श्रीरामपूर 34, कॅन्टोन्मेंट 03, मिलिटरी हॉस्पिटल 01 आणि इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

...................

* बरे झालेली रुग्ण संख्या 43 हजार 497

* उपचार सुरू असलेले रूग्ण 4 हजार 100

* मृत्यू 750

* एकूण रूग्ण संख्या 48 हजार 347

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com