कोपरगाव तालुक्यात 136 करोना पॉझिटिव्ह रूग्ण

दोघांचा मृत्यू
कोपरगाव तालुक्यात 136 करोना पॉझिटिव्ह रूग्ण

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) -

कोपरगाव शहरासह तालुक्यात 18 एप्रिल रोजी सापडलेल्या 100 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात 95 तर खासगी लॅब मधील 19 तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 22 असे ऐकून 136 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर तालुक्यातील मढी 56 वर्षीय पुरुषाचा व खोपडी 55 वर्षीय पुरुषा या दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसात एकूण 136 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यात शहरातील 6, खडकी येथील 6, निवारा येथील 5, दत्त नगर येथील 3, हनुमान नगर येथील 3, स्टेशन रोड येथील 3, धारणगाव रोड येथील 2, बेट येथील 2, अन्नपूर्णा नगर येथील 2, ईशान नगर येथील 2, साई रेसिडेंसि येथील 2, स्टेट बँक येथील 1, ओम नगर येथील 1, गांधी नगर येथील 1, सह्याद्री कॉलनी येथील 1, स्वामी समर्थ नगर येथील 1, सप्तर्षी मळा येथील 1, रेणुका नगर येथील 1, साईधाम येथील 1, बैल बाजार रोड येथील 1, मोहिनीराज नगर येथील 1, ब्रिजलाल नगर येथील 1, येवला रोड येथील 1, ग्रामीण मधील करंजी येथील 10, दहेगाव बोलका येथील 7, खोपडी येथील 5, घारी येथील 5, कोळपेवाडी येथील 4, कोकमठाण येथील 3, जे. पाटोदा येथील 3, येसगाव येथील 3, रवंदे येथील 3, दशरथ वाडी येथील 3, उक्कडगाव येथील 3, ब्राह्मणगाव येथील 2, माहेगाव देशमुख येथील 2, जे. कुंभारी येथील 2, लौकी येथील 2, संवत्सर येथील 2, कुंभारी येथील 2, टाकळी येथील 2, 3 चारी येथील 2, मूर्शतपूर येथील 1, सांगावी भुसार येथील 1, सुरेगाव येथील 1, संजीवनी येथील 1, डोर्‍हाळे येथील 1, पोहेगाव येथील 1, डाऊच येथील 1, भोजडे येथील 1, खिर्डी गणेश येथील 1, ओगदी येथील 1, दत्तवाडी येथील 1, गोधेगाव येथील 1, तळेगाव येथील 1, वेळापूर येथील 1, धामोरी येथील 1, मढी येथील 1, चांदगव्हाण येथील 1, लोणकर वस्ती येथील 1, सोनार वस्ती येथील 1, देवी रस्ता रोड येथील 1 असे 136 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे. तालुक्यात 19 एप्रिल पर्यंत 17 हजार 321 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून 16 हजार 139 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 1140 अ‍ॅक्टिव पेशंट आहे तर आज पर्यंत 30 हजार 455 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. तालुक्यात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची 22.08 टक्के आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.11 टक्के असे आहे. तर 83 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com