राहुरीच्या ग्रामीण भागात करोनाग्रस्त वाढले

राहुरीच्या ग्रामीण भागात करोनाग्रस्त वाढले

राहुरी (प्रतिनिधी) - राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागात करोनाग्रस्तांचे प्रमाण वाढले आहे. चिंचोली गावातील तांभेरे रस्त्याचा परिसर सध्या करोना हॉटस्पॉट झाला आहे. या परिसरात आठवडाभरात पाचजण तर त्या अगोदर दोनजण दगावले असून त्यात पतीपत्नीचा समावेश आहे. तर काहीजण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. बहुतांश नागरिक मजूर असल्याने आर्थिक कारणाअभावी आजार लपवून ठेवत असल्याने करोनाग्रस्तांनी संख्या वाढू लागली आहे. आरोग्य प्रशासनाने तातडीने या भागातील नागरिकांच्या कोविड तपासण्या सुरू केल्या आहेत.

गेल्या आठवडाभरात एकाच परिसरातील जवळपास पाचजण दगावले. त्यात पतीपत्नीचा समावेश आहे. पत्नीचे तीन दिवसापूर्वी निधन झाले, तर पतीची कोव्हिड तपासणी होऊन रूग्णालयात दाखल केल्यानंतर दोन तासातच पतीचे निधन झाले. तीन दिवसाच्या अंतरात पतीपत्नीचे निधन झाले. तर आणखी एक रुग्ण उपचाराविना घरीच मयत झाला असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

आर्थिक ओढाताण असल्याने खासगी रुग्णालयातील उपचार परवडतील का? असाही प्रश्‍न गरीब नागरिकांसमोर असल्याने तपासण्या करण्याकडे त्यांचा कल नसतो. म्हणून मृत्यूचे प्रमाण वाढते. घरात आजारी रुग्ण असून सुध्दा आशा सेविकांना चुकीची माहिती दिल्याने या रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याने यामुळे रुग्णवाढीला ब्रेक लागण्याऐवजी ती वाढत जाण्याचे प्रमाण अधिक आहे. या भागातील काहीजण सध्याही खासगी रुग्णालयात भरती होऊन उपचार घेत आहेत. या परिसरात दाट लोकवस्ती असल्याने एकमेकांचा संपर्क अधिक येत असल्यामुळे रुग्णवाढ होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com