श्रीरामपूर तालुक्यात काल 189 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात काल 189 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - श्रीरामपूर तालुक्यात काल 189 रुग्ण सापडले आहेत. तर 1184 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 153 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्हा रुग्णालयात 41, खासगी रुग्णालयात 65 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 83 असे रुग्ण आढळून आले आहेत.

यात काल 153 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 1184 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 4384 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 2111 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर सध्या एकूण अंदाजे 1184 रुग्ण विविध कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. गेल्या आठवडाभरात करोनाने कहर केला होता. त्यावेळी दिडशेच्या वरचा टप्पा गेल्या तीन चार दिवसांपासून कायम ठेवला आहे. काल पुन्हा 189 रुग्ण आढळून आले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com