श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

श्रीरामपूर तालुक्यात काल नवीन 8 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. कोविड सेंटरमध्ये 22 जणांची अॅन्टीजन तपासणी

करण्यात आली. यात 1 जण करोनाबाधि तर 21 निगेटीव्ह आढळून आले. खासगी प्रयोगशाळेतील 5 व घशाचे स्त्राव घेतलेल्या 33 जणांपैकी 2 जण असे एकूण 8 जण करोनाबाधित आढळून आले आहेत.

कोविड सेंटरमध्ये 22 जणांची अॅन्टीजन तपासणी करण्यात आली. यात 1 पॉझिटीव्ह आढळून आला.

पॉझिटीव्ह मध्ये एकजण पढेगाव तर एक जण शहरातील वॉर्ड नं. 7 मधील आहे. काल 4 जणांचे घशाचे स्त्राव घेण्यात आले आहेत. 11 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. आतापर्यंत श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत 13003 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली त्यात 3207 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल 4 जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.