<p><strong>श्रीरामपूर (प्रतिनिधी) - </strong></p><p>श्रीरामपूर तालुक्यात काल 6 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. काल श्रीरामपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये</p>.<p>5 जणांची अॅन्टीजन तपासणी करण्यात आली. यात 2 जण पॉझिटीव्ह तर घशाचे स्त्राव घेतलेल्या 44 जणांपैकी 4 जण पॉझिटीव्ह आढळून आले आहे. चार पॉझिटीव्ह मध्ये दोन गोंेडेगाव व दोेघे अशोकनगर येथील रुग्ण आहेत. काल 2 नवीन रुग्ण दाखल करण्यात आला असून 8 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत 12950 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली असून त्यात 3184 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल दोन जणांचे घशाचे 2 स्त्राव घेण्यात आले.</p>