श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

श्रीरामपूर तालुक्यात काल दोन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल श्रीरामपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड

सेंटरमध्ये 37 जणांची अॅन्टीजेन तपासणी करण्यात आली. यात एक जण पॉझिटीव्ह तर 36 निगेटीव्ह आढळून आले आहेत. तसेच घशाचे स्त्राव घेतलेल्यांमध्ये 1 असे दोन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

काल एक नवीन रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून ,एकूण सहा जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तालुक्यात कालपर्यंत 12901 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली त्यात 3177 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. करोना रुग्ण संख्या घटत चालल्याचे आशादायक चित्र तालुक्यात दिसत असले तरी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.