श्रीरामपूर तालुक्यात 160 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह

07 नवीन करोनाबाधित ; 16 रुग्णांना डिस्चार्ज
श्रीरामपूर तालुक्यात 160 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह

श्रीरामपूर (प्रतिनिधी) / Shrirampur - श्रीरामपूर तालुक्यात काल केवळ 09 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 160 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेवून बरे झालेल्यांची संख्या काल 16 होती.

जिल्हा रुग्णालयात 01, खासगी रुग्णालयात 02 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 04 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 15772 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 15637 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात काल वॉर्ड नं. 3 -01, वॉर्ड नं. 7-02 असे 03 तर ग्रामीण भागात हरेगाव-01, वडाळा महादेव-01, शिरसगाव- 01 असे 03 रुग्ण आहेत. बाहेरील तालुक्यातील 01 रुग्ण आढळून आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com