श्रीरामपूर तालुक्यात करोना रुग्णसंख्या घटली

87 नवीन रुग्ण, 38 जणांना डिस्चार्ज; 1393 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह
श्रीरामपूर तालुक्यात करोना रुग्णसंख्या घटली

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - श्रीरामपूर तालुक्यात काल तालुक्यात 87 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण संख्येत घट झाल्याने श्रीरामपूरकराना रविवारी दिलासा मिळाला. आता 1393 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेवून बरे झालेल्यांची संख्या काल 38 होती.

जिल्हा रुग्णालयात 02 खासगी रुग्णालयात 52 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 33 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 14575 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 13072 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

काल शहरातील वॉर्ड नं. 1-13, वॉर्ड नं. 2-01, वॉर्ड नं. 3-04, तर वॉर्ड नं. 7-11 असे शहरात 29 रुग्ण आहेत. तर ग्रामीण भागात बेलापूर-08, उक्लगाव-03, पढेगाव-03, कान्हेगाव-03, भेर्डापूर-01, कारेगाव-03, उंबरगाव-01, वळदगाव-01, गुजरवाडी-01, टाकळीभान-03, उंदिरगाव-04, माळेवाडी-02, निमगावखैरी-01, गोंधवणी-01, दत्तनगर-01, खंडाळा-01, शिरसगाव-05, रामपूर-02, खानापूर-01, अशोकनगर-01 असे एकूण 44 रुग्ण आहेत.

शहरात एकूण 29 ग्रामीण 44 तर अन्य तालुक्यातील तसेच ज्यांचे मोबाईल नंबर व नावे चुकीचे आहेत असे 14 रुग्ण असून असे एकूण 87 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

काल करोनाबाधितांची संख्या पुन्हा कमी झाल्याने दिलासा मिळाला. तर बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्या खूपच कमी झाल्याने अ‍ॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे काल अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 1393 वर जावून पोहोचली असून हेरुग्ण श्रीरामपूर, जिल्हा तसेच जिल्हाबाहेरील रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आज लसीकरण सुरु

ग्रामीण रुग्णालर श्रीरामपूर अंतर्गत असणारे आगाशे हॉल,आझाद मैदान लसीकरण केंद्र, श्रीरामपूर रेथे आज सोमवार दि. 31 मे 2021 रोजी कोव्हॅक्सीन या लसीच्या दुसर्‍या डोससाठी 240 डोस उपलब्ध आहेत. लसीकरणासाठी पात्र लाभार्थ्यांनी आज सकाळी 09:00 वाजता रावे. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात येणार आहेत. दुसर्‍रा डोससाठी ज्रांना नगरपालिका श्रीरामपूर यांच्राकडून फोनद्वारे संपर्क साधला गेलेला आहे त्रांनीच लसीकरणसाठी रावे.

- डॉ. योगेश बंड,

प्र. अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, श्रीरामपूर.

Related Stories

No stories found.