श्रीरामपूर तालुक्यात 187 करोनाबाधित

64 जणांना डिस्चार्ज; 1472 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण
श्रीरामपूर तालुक्यात 187 करोनाबाधित

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - श्रीरामपूर तालुक्यात आज पुन्हा दिलासा मिळाला असून आज तालुक्यात 187 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज 1472 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. 64 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 02 खासगी रुग्णालयात 118 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 67 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 8937 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 6384 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात 50 तर ग्रामीण भागात 119 असे 169 आहेत. तर अन्य तालुक्यातील तसेच ज्यांचे मोबाईल नंबर व नावे चुकीचे आहेत असे 18 रुग्ण असून असे एकूण 196 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील वॉर्ड नं. 1-15, वॉर्ड नं. 2-03 वॉर्ड नं. 3-09, वॉर्ड नं. 4-01, वॉर्ड नं. 5-02, वॉर्ड नं. 6-02 तर वॉर्ड नं. 7-18 असे शहरात 50 तर ग्रामीण भागात बेलापूर बुद्रुक-20, ऐनतपूर-03, एकलहरे-01, उक्कलगाव-01, गळनिंब-01, फत्याबाद-03, पढेगाव-06, मालुंजा-01, लाडगाव-01, भेर्डापूर-04, कारेगाव-02, मातापूर-05, उंबरगाव-08, वळदगाव-03, टाकळीभान-18, भोकर-04, खिर्डी-01, वांगी बुद्रुक-01, उंदिरगाव-02, हरेगाव-01, माळेवाडी-03, गोवर्धन-01, महांकाळवाडगाव-01, निमगाव खैरी-04, दिघी-01, दत्तनगर-01, शिरसगाव-08, नाऊर-02, जाफराबाद-01, गोंडेगाव-02, माळवाडगाव-02, भामाठाण-03, वडाळा महादेव-03,निपाणीवडगाव-01 असे 159 करोनाबाधित रुग्ण आहेत. तर अन्य तालुक्यातील तसेच ज्यांचे मोबाईल नंबर व नावे चुकीचे आहेत असे 18 रुग्ण असून असे एकूण 187 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com