श्रीरामपूर : 297 जणांना डिस्चार्ज

श्रीरामपूर : 297 जणांना डिस्चार्ज

183 करोनाबाधितांची भर ; 1442 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - श्रीरामपूर तालुक्यात काल पुन्हा दिलासा मिळाला असून काल तालुक्यात 183 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.काल 1442 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. 297 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 15 खासगी रुग्णालयात 107 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 61 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 8554 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 6036 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात 43 तर ग्रामीण भागात 123 असे 166 आहेत. तर अन्य तालुक्यातील तसेच ज्यांचे मोबाईल नंबर व नावे चुकीचे आहेत असे 17 रुग्ण असून असे एकूण 183 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील वॉर्ड नं. 1-13, वॉर्ड नं. 2-02 वॉर्ड नं. 5-02, वॉर्ड नं. 6-08 तर वॉर्ड नं. 7-18 असे शहरात 43 तर ग्रामीण भागात बेलापूर बुद्रुक-18, ऐनतपूर-01, उक्कलगाव-03, गळनिंब-01, फत्याबाद-02, कडीत बुद्रुक-01, पढेगाव-10, मालुंजा-02, लाडगव-04, भेर्डापूर-03, कारेगाव-11, मातापूर-02, उंबरगाव-04, टाकळीभान-07, भोकर-02, घुमनदेव-01, वांगी बुद्रुक-01, उंदिरगाव-06, ब्राम्हणगाव-01, हरेगाव-03, माळेवाडी-15, निमगाव खैरी-05, दत्तनगर-05, शिरसगाव-04, नाऊर-01, गोंडेगाव-02, भामाठाण-01, खोकर-02, वडाळा महादेव-03, अशोकनगर-02 असे 123 करोनाबाधित रुग्ण आहेत. तर अन्य तालुक्यातील तसेच ज्यांचे मोबाईल नंबर व नावे चुकीचे आहेत असे 17 रुग्ण असून असे एकूण 183 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com