श्रीरामपूर तालुक्यात 113 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात 113 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

श्रीरामपूर तालुक्यात काल पुन्हा करोनाचा कहर झाला असून काल तालुक्यात 113 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्या काल 97 असल्याने बरे होण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे.

काल 113 रुग्ण सापडले आहे. तर 1243 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 97 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 33 खासगी रुग्णालयात 34 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 46 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 97 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्रात एकूण 1243 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 5695 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 3366 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 1243 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

काल शहरात 64 तर ग्रामीण भागात 41 अन्य 08 असे 105 रुग्ण आहेत. यात शहरात वॉर्ड नं. 1-12, वॉर्ड नं. 3-08, वॉर्ड नं. 4-03, वॉर्ड नं. 6-07, वॉर्ड नं. 07-34 असे 64 तर ग्रामीण भागात कुरणपूर-01,भैरवनाथनगर-04, गळनिंब-01, घमनदेव-01, खंडाळा-07, शिरसगाव-08, गोंधवणी-04, हरेगाव-02, भेर्डापूर-01, गोंडेगाव-01, निपाणीवडगाव-03, वळदगाव-02, नरसाळी-01, वडाळा महादेव-01, नायगाव-01, बेलापूर-02, टाकळीभान-01, असे 41 तर बाहेर तालुक्यातील तसेच मोबाईल नंबर व पत्ता चुकीचे दिलेले असे एकूण 08 रुग्ण आहेत.

करोनाबाधितांची आकडेवारी कमी होत असली तरी बरे होण्याचे प्रमाणही तालुक्यात चांगले असल्यामुळे करोनाबाधित रुग्णांमध्ये घट होण्याची चिन्हे दिसत आहेत.

तालुक्यात करोना केअरची संख्या वाढल्याने काहीसा दिलासा

श्रीरामपूर तालुक्यात करोना संसर्ग वाढत असल्यामुळे सर्वांनीच चिंता व्यक्त केली होती. त्यासाठी थोडा त्रास झाला तरी अंगावर न काढता तसेच सहन न करता घरातच विलगिकरण न होता करोना केअरसेंटरमध्ये जावून प्राथमिक उपचार घेणे गरजेचे आहे. यामुळे हा आजार थोडक्यातच बरा होवून याची व्याप्ती वाढणार नाही. त्यासाठी सध्या करोना केअर सेंटरची उभारणी बर्‍याच ठिकाणी झाली. तालुक्यात खैरीनिमगाव, बेलापूरमध्ये दोन ठिकाणी, वळदगाव, तसेच शहरात विविध भागात करोना केअर सेंटर उभारण्यात आले आहे. त्यामुळे करोनाचा प्राथमिक त्रास जाणवू लागल्यास त्यांनी करोना केअरमध्ये जावून विलगीकरणात राहिल्यास नक्कीच करोनाला आळा बसणार आहे. कालच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी करोनाचा त्रास जाणवू लागल्यास त्यांनी घरातच राहू नये. घरात राहिल्याने घरातील सगळ्यांनाच करोनाचा विळखा बसू शकेल. घरातील लोकांचा त्रास वाचविण्यासाठी करोना केअर सेंटरचा आधार घ्यावा, असे आवाहन केले होते. या केअर सेंटरमध्ये जास्त त्रास जाणवू लागला तर त्या प्रमाणात काळजी घेवून त्याला करोना सेंटरमध्ये दाखल करुन उपचार तातडीने करण्यात येवून त्याचे प्राण वाचू शकतील अथवा तो या करोना आजारातून लवकर बरा होणार आहे. या करोना केअर सेंटरमुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com