श्रीरामपूर तालुक्यात 158 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात 158 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

श्रीरामपूर तालुक्यात आज पुन्हा करोनाचा कहर झाला असून आज तालुक्यात 158 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्या आज 188 असल्याने बरे होण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे.

आज 158 रुग्ण सापडले आहे. तर 1227 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. आज 177 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 48 खासगी रुग्णालयात 67 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 43 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात आज 188 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्रात एकूण 1227 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 5582 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 3269 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 1227 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

आज शहरात 82 तर ग्रामीण भागात 58 अन्य 18 असे 158 रुग्ण आहेत. यात शहरात वॉर्ड नं. 1-20 वॉर्ड नं. 2-10, वॉर्ड नं. 3-06, वॉर्ड नं. 5-05, वॉर्ड नं. 6-08, वॉर्ड नं. 07-33 असे 82 तर ग्रामीण भागात गोंधवणी-05, शिरसगाव-05, मातापूर-03, खंडाळा-03, वडाळा महादेव-01, कारेगाव-01, वळदगाव-01, उंदिरगाव-04, भोकर-01, टाकळीभान-03, बेलापूर-11, दत्तनगर-01, मालुंजा-02, मुठेवाडगाव-03, निपाणीवडगाव-02, खोकर -02, हरेगाव-03, रामपूर-01, पढेगाव-01, नायगाव-01, उंबरगाव-01, खानापूर-01, अशोकनगर-01, ब्राम्हणगाव वेताळ-01 असे 58 तर बाहेर तालुक्यातील तसेच मोबाईल नंबर व पत्ता चुकीचे दिलेले असे एकूण 18 रुग्ण आहेत.

करोनाबाधितांची आकडेवारी कमी जास्त होत असली तरी बरे होण्याचे प्रमाण तालुक्यात चांगले असल्यामुळे करोनाबाधित रुग्णांमध्ये घट होण्याची चिन्हे दिसत आहेत.

रेेमडीसीवीर व ऑक्सीजनसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित यावे

करोना संसर्गाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता सगळीकडे रेमडेसीवीर इंजेक्शन औषध व ऑक्सीजनचा मोठा तुटवडा असल्यामुळे अनेक रुग्ण दगावले आहेत. अनेक रुग्णांना जीवनाशी झगडावे लागत आहे. सगळ्या तालुक्यात आपापला आमदार, खासदार तसेच स्थानिक सगळ्या पक्षाचे नेते प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र श्रीरामपूर तालुक्याला सध्या कोणीच वाली दिसत नाही. मोठी वाईट अवस्था सध्या श्रीरामपूर तालुक्यात पहावयास मिळत आहे. ऑक्सीजन बेड व रेमडीसीवीर इंजेक्शन मिळत्त नाही म्हणून रुग्णाला घेवून नातेवाईक जिल्ह्यातील सर्व दवाखाने पायी तुडवत बेड आहे का? अशी आर्त हाक मारताना दिसत आहेत. मात्र कोणत्याही ठिकाणी श्रीरामपूरच्या रुग्णाला बेड मिळत्त नाही. पुन्हा तो रुग्ण श्रीरामपूरला आणला जातो. काही रुग्ण आणता आणता गतप्राणही होतो. तीच व्यवस्था आज श्रीरामपुरात असती किंवा नियोजन करणारा नेता असता तर ही परिस्थिती आज श्रीरामपूरवर आली नसती. वरिष्ठ मंत्र्यांना विचारले जाते तेव्हा सगळीकडेच शॉर्टजे आहे काय करणार? असे उत्तर दिले जाते मात्र त्यांच्या तालुक्यात एवढी भयाण परिस्थिती दिसत नाही. उलट त्यांच्याच तालुक्यातून जादा दराने रेमडीसीवीर इंजेक्शन आणले जात आहेत. मग हे काळ्याबाजारात विकत आणलेले इंजेक्शन त्यांच्याकडे आले कुठून असा सवाल नागरिक विचारत आहेत. त्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, आमदार, खासदारांनी एकत्रीत येवून ही समस्या सोडवली तर नक्कीच हे वातावरण दूर होवू शकेल. व रुग्णांना दिलासा मिळेल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com