श्रीरामपूर तालुक्यात 200 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात 200 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

श्रीरामपूर तालुक्यात आज पुन्हा करोनाचा कहर झाला असून आज तालुक्यात 200 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्या आज 177 असल्याने बरे होण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे.

आज 174 रुग्ण सापडले आहे. तर 1257 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. आज 177 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 03 खासगी रुग्णालयात 74 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 123 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात आज 177 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 1257 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 5624 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 3081 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 1257 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

आज शहरात 91 तर ग्रामीण भागात 95 अन्य 14 असे 200 रुग्ण आहेत. यात शहरात वॉर्ड नं. 1-18 वॉर्ड नं. 2-10, वॉर्ड नं. 3-09, वॉर्ड नं. 4 -08, वॉर्ड नं. 5-02, वॉर्ड नं. 6-10, वॉर्ड नं. 07-34 असे 91 तर ग्रामीण भागात फत्याबाद-01, कुरणपूर-01, वडाळा महादेव-01, अशोकनगर-04, मालुंजा-06, नाऊर-01, टाकळीभान-02, उंदिरगाव-03, उंबरगाव-07, बेलापूर-17, महांकाळवाडगाव-04, वळदगाव-02, खंडाळा-04, मातापूर-04, शिरसगाव-04, पढेगाव-05, कारेगाव-01, गोंधवणी-04, नरसाळी-01, निपाणीवडगाव-01, माळेवाडी-02, भेर्डापूर-01, ब्राम्हणगाव वेताळ-03, निमगाव खैरी-11, उक्कलगाव-01, दत्तनगर-01, भोकर-02, दिघी-01 असे एकूण 95 तर बाहेर तालुक्यातील तसेच मोबाईल नंबर व पत्ता चुकीचे दिलेले असे एकूण 14 रुग्ण आहेत.

श्रीरामपूरलाच का मिळत नाही रेमडीसीवीर?

सगळ्यांचेच दुर्लक्ष; नागरिकांत चीड

श्रीरामपूर शहरातील 16 कोविड सेंटरमधून आज 300 हून करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहे. तशी परदिवशी किमान 250 हून अधिक रेमडीसीवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे. परंतु आज केवळ 13 रेमडीसीवीर इंजेक्शन आले असल्याची माहिती आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिली. परंतु शासकीय आकडेवारीनुसार आज मोरगे हॉस्पिटलला 48 रेमडीसीवीर इंजेक्शन आले असून त्यापैकी साईश्रध्दा कोविड सेंटरला-01, युनिटी हास्पिटलला-01, संजीवनी हॉस्पिटल-05, अल्फा हॉस्पिटलला-04 तर साई शितल कोविड सेंटरला 02 असे 13 रेमडीसीवीर इंजेक्शन पुरविण्यात आले आहेत. एवढे मोठे शहर, त्यात जिल्ह्यात तीन ते चार नंबर रुग्णसंख्येत असलेल्या श्रीरामपूरला केवळ 13 इंजेक्शन मिळणे ही बाब दुदैवी आहे. आज शहरात 250 हून अधिक करोनाबाधित रुग्ण शहरातील वेगवेगळ्या कोविड सेंटरला उपचार घेत असताना एवढे कमी रेमडेसीवीर येण्याचे कारण काय? असा सवाल रुग्णांनी केला आहे. रेमडीसीवीर इंजेक्शन मिळत नाही म्हणून काही रुग्ण दगावले जात आहेत. याचे गांभीर्य कोणालाच नाही. किमान लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले असते तर काही रेमडेसीवीर इंजेक्शन मिळाले असते व काही रुग्णांचे प्राणही वाचले असते. तसेच यात केवळ राजकारण करणे व चांगल्या कामाचे श्रेय घेणे एवढेच काय राजकारण सुरु आहे. मात्र रोज रुग्ण किती दगावले जातात याकडे कोणीही लक्ष देत नसल्याबाबत चीड व्यक्त केली जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com