श्रीरामपूर तालुक्यात 174 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात 174 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

श्रीरामपूर तालुक्यात आज पुन्हा करोनाचा कहर झाला असून तालुक्यात 174 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्या काल 165 असल्याने बरे होण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे.

आज 174 रुग्ण सापडले आहे. तर 1234 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 165 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 02 खासगी रुग्णालयात 73 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 99 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात आज 165 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 1234 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 5424 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 2904 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 1234 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

आज शहरात 78 तर ग्रामीण भागात 80 अन्य 16 असे 174 रुग्ण आहेत. यात शहरात वॉर्ड नं. 1-24 वॉर्ड नं. 2-03, वॉर्ड नं. 3-07, वॉर्ड नं. 6-08, वॉर्ड नं. 07-36 असे 78 तर ग्रामीण भागात दत्तनगर-05, शिरसगाव-02, उक्कलगाव-01, अशोकनगर-03, बेलापूर-03, शिसरगाव-06 खैरी निमगाव-09, उंदिरगाव-09, टाकळीभान-02, भोकर-02, गोंधवणी-11, मातापूर-02, रामपूर-02, खानापूर-01, वळदगाव-01, दिघी02, मालुंजा-02, वडाळा महादेव-02, कमालपूर-01, खोकर-01, महांकाळवाडगाव-04, ब्राम्हणगाववेताळ-01, गुजरवाडी-01, वांगी-01, कारेगाव-03, पढेगाव-02, हरेगाव-01 असे एकूण 80 तर बाहेर तालुक्यातील तसेच मोबाईल नंबर व पत्ता चुकीचे दिलेले असे एकूण 16 रुग्ण आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com