श्रीरामपूर तालुक्यात 225 करोनाबाधित

श्रीरामपूर तालुक्यात 225 करोनाबाधित

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

श्रीरामपूर तालुक्यात काल पुन्हा करोनाचा कहर झाला असून काल तालुक्यात 225 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्या काल 64 असल्याने बरे होण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे.


काल 225 रुग्ण सापडले आहे. तर 1225 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 64 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 32 खासगी रुग्णालयात 38 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 155 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 64 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 1225 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 5250 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 2739 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 1225 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

काल शहरात 68 तर ग्रामीण भागात 142 अन्य 15 असे 225 रुग्ण आहेत. यात शहरात वॉर्ड नं. 1-08 वॉर्ड नं. 2-07, वॉर्ड नं. 3-07, वॉर्ड नं. 4-01, वॉर्ड नं. 5-05, वॉर्ड नं. 6-15, वॉर्ड नं. 07-25 असे 68 तर ग्रामीण भागात दत्तनगर-15, माळेवाडी-01, गोंधवणी-04, उक्कलगाव-06, मालुंजा-10, उंदिरगाव-14, टाकळीभान-05, रामपूर-01,बेलापूर-18,दिघी-02, अशोकनगर-03, निपाणी वडगाव-06, शिरसगाव-04, हरेगाव-04, नरसाळी-01, उंबरगाव)-02, वडाळा महादेव-05, वळदगाव-03, ब्राम्हणगाव वेताळ-01, गोंडगाव-01, पढेगाव-05, कारेगाव-03, लाडगाव-01, मातापूर-01, फत्याबाद-02, गळनिंब-01, खोकर-02, कमालपूर-02, भोकर-01, कुरणपूर-01, पाचवाडी-03, महांकाळवाडगाव-02,वांगी-03, गेावर्धन-01, नायगाव-01, निमगाव खैरी-05, कान्हेगाव-01, असे एकूण 142 तर बाहेर तालुक्यातील तसेच मोबाईल नंबर व पत्ता चुकीचे दिलेले असे एकूण 29 रुग्ण आहेत.

ऑक्सिजन सिलेंडर शासनाला जमा करण्याचे प्रांताधिकारी व तहसीलदारांचे आवाहन

- राज्यात कोरोणा महामारी वाढत चालली असून त्यामुळे रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत चालली आहे उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी कोवीड हाँस्पिटलला भेटी देवुन करोना रुग्णांची माहीती घेतली त्यावेळी बर्‍याच ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता भासू लागल्याने श्रीरामपूर येथील प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी खासगी एजन्सी व ज्याच्याकडे ऑक्सिजन सिलेंडर आहेत त्यांना ऑक्सिजन सिलेंडर शासनाकडे जमा करण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण राज्यात हॉस्पिटलमध्ये करोनाचे रुग्ण वाढल्याने ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा झालेला आहे. सद्या खासगी व्यवसाय संपूर्णपणे बंद आहेत व ऑक्सिजन सिलेंडरचे एजन्सीधारक व काही खासगी लोकांकडे ऑक्सिजन सिलेंडर पडून आहेत. आज व्यवसायापेक्षा लोकांचे जीव वाचवणे महत्वाचे झाल्याने स्वतः प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी खासगी व एजंसी धारकाकडे जाऊन ऑक्सिजन सिलेंडरचे रेकॉर्ड चेक करून माहिती घेतली व ऑक्सिजन सिलेंडर शासनाला जमा करण्याचे आवाहनही केले आहे. श्रीरामपूर येथे अनेक एजन्सी आहेत व असे अनेक व्यावसायिक आहेत की ज्यांच्याकडे ऑक्सिजन सिलेंडरचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो; परंतु आज लोकांचे जीव वाचवणे महत्वाचे झाल्याने उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी व्यावसायिक व एजन्सी धारकांनी ऑक्सिजन सिलेंडर शासनाला जमा करण्याचे आवाहन केले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com