श्रीरामपूर तालुक्यात 178 करोनाबाधित रुग्ण

करोनाने आज पुन्हा डोके वर काढले
श्रीरामपूर तालुक्यात 178 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

श्रीरामपूर तालुक्यात आज 178 रुग्ण सापडले आहे. तर 1148 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 111 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 76 खासगी रुग्णालयात 12 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 90 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात आज 111 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्रात एकूण 1081 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 4195 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 1958 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 1148 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

गेल्या आठवडाभरात करोनाने कहर केला होता. त्यावेळी शंभर दोनशेचे आकडे पार करुन करोना संसर्गाने कहर केला होता. काल पुन्हा 178 रुग्ण आढळून आल्याने करोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com