श्रीरामपूर शहर व तालुक्यात ‘इतके’ करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर शहर व तालुक्यात ‘इतके’ करोनाबाधित रुग्ण

137 जणांची रॅपीड तपासणी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

श्रीरामपूर तालुक्यात काल केवळ 17 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहात

काल रॅपीड तपासणी करण्यात आली असून रॅपीड 137 जणांची तपासणी करण्यात आली. यात 09 पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालयात 04 जण खासगीत 04 जण असे 17 पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहात काल रॅपीड तपासणी करण्यात आली असून 137 जणांची रॅपीड तपासणी करण्यात आली असून यात 09 पॉझिटीव्ह तर 128 निगेटीव्ह आढळून आले आहेत. यात निपाणी वडगाव-1, भामाठाण-1, गोंधवणी-2, बेलापूर-3 गोंडेगाव-2 असे 09 रुग्ण आढळून आले.

श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत करोनाबाधितांचा आकडा 2482 पर्यंत जावून पोहोचला आहे. काल एकूण 10 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहेत. श्रीरामपूर येथील सरकारी कोविड सेंटरमध्ये 28 जण उपचार घेत आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत 8060 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली असून कालपर्यंत 2482 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 40 वर जावून पोहोचली आहे. काल येथील 3 रुग्णांना अन्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com