श्रीरामपूर तालुक्यात 165 करोनाबाधित रुग्ण

करोनाने काल पुन्हा डोके वर काढले
श्रीरामपूर तालुक्यात 165 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - श्रीरामपूर तालुक्यात काल 165 रुग्ण सापडले आहे. तर 1081 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 71 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 21 खासगी रुग्णालयात 62 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 82 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 71 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्रात एकूण 1081 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 4017 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 1847 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 1081 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

श्रीरामपूर शहरात 44 रुग्ण असून तर तालुक्यात 119 व अन्य तालुक्यातील 2 रुग्ण आढळून आले आहेत.

शहरात वॉर्ड नं. 1-12, वॉर्ड नं. 2-02, वॉर्ड नं. 3-04, वॉर्ड नं. 5-03, वॉर्ड नं. 4 -01, वॉर्ड नं. 6-07, वॉर्ड नं. 7-15 असे 44 रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात नायगाव-01, बेलापूर-12, निपाणी वडगाव-07, खंडाळा-01, फत्याबाद-03, निमगाव खैरी-06, टाकळीभान-02, शिरसगाव-01, भोकर-12, गोंधवणी-07, मालुंजा-09, वांगी-01, गोंडेगाव-05, अशोकनगर-05, उक्कलगाव-04, खानापूर-02, वडाळा महादेव-01, भेर्डापूर-01, दत्तनगर-03, उंबरगाव-02, हरेगाव-01, मुठेवाडगाव-02, उंदिरगाव-08, कारेगाव-01, महांकाळवाडगाव-02, नरसाळी-01, मातापूर-01, कान्हेगाव-02, दिघी-03, पढेगाव-06, माळवाडगाव-01, भामाठाण-01, रामपूर-03, नाऊर-01, खिर्डी-01 असे एकूण 119 आहेत. तर अन्य अन्य तीन पत्ते माहित नसल्यामुळे श्रीरामपूरात वर्ग झालेले रुग्ण आहेत.

गेल्या आठवडाभरात करोनाने कहर केला होता. त्यावेळी शंभर दोनशेचे आकडे पार करुन करोना संसर्गाने कहर केला होता. काल पुन्हा 165 रुग्ण आढळून आल्याने करोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com