श्रीरामपूर तालुक्यात नवीन 200 करोनाबाधित

श्रीरामपूर तालुक्यात नवीन 200 करोनाबाधित

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

श्रीरामपूर तालुक्यात काल उच्चांकी 200 रुग्ण सापडले आहे. तर 930 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये

उपचार घेत आहेत. काल 75 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 36 खासगी रुग्णालयात 25 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 139 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 75 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 930 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 3786 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 1767 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 930 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

गेल्या आठवडाभरात करोनाने श्रीरामपूर तालुक्यात चांगलेच डोके वर काढले आहे. शहरातील रुग्णालयांमध्ये नवीन रुग्णांना बेड शिल्लक राहिले नसल्याने रुग्णांंना जिल्हा रुग्णालय व नगर शहरात रुग्णालयात शोधण्यासाठी वणवण भटकावे लागले. यात काहींचा मृत्यू झाला. रेडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवल्याने रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची चांगलीच फरफट झाली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com