श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

श्रीरामपूर तालुक्यात काल उच्चांकी 79 रुग्ण सापडले आहे. तर 734 रुग्ण अॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत

आहेत. काल 91 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 00 खासगी रुग्णालयात 47 तर अॅन्टीजन तपासणीत 32 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 91 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 734 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 1946 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 1110 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 734 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. श्रीरामपूर शहरात 30 तर ग्रामीण भागात 46 असे 76 असून अन्य तालुक्यातील 3रुग्णांचा समावेश आहे. श्रीरामपूर शहरात वॉर्ड नं. 1-12, वॉर्ड नं. 2-03, वॉर्ड नं. 3 -02, वॉर्ड नं. 6-02, व वॉर्ड नं. 7-11 तसेच शहरात अन्य ठिकाणी केलेल्या तपासणीत 21 असे एकूण 40 रुग्ण आढळून आले.

श्रीरामपूर ग्रामीण भागातल गोंधवणी-05, वडाळा महादेव-03, उंबरगाव-03, टाकळीभान-03, नरसाळी -01, माळवाडगाव-02, कमालपूर-01, भोकर-02, उंदिरगाव-10, माळेवाडी-01, पढेगाव-01,दिघी-01, मातुलठाण-01, बेलापूर-10, एकलहरे-01, वांगी-01, असे एकूण 46 रुग्ण असून अन्य तालुक्यातील तीघांमध्ये एक राहुरी तालुक्यातील महाडुक सेंटर तर पूर्ण पत्ते नसल्यामुळे श्रीरामपूरमध्ये वर्ग केलेले दोघेजण असे तीन जण आहेत.

शहरात करोना प्रतिबंधात्मक लसीकरण व कोविड सेंटर सुरु करणार - आदिक

श्रीरामपूर पालिकेच्यावतीने लवकरच शहरात करोना प्रतिबंधात्मक लसीकरनाबरोबरच कोविड सेंटर सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी दिली. शहरातील नागरिकांसाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात नगराध्यक्षा आदिक यांनी पालिकेत बैठक आयोजित केली होती. सध्या ग्रामीण रुग्णालयात मोफत लसीकरण सुरू आहे. हे रुग्णालय शहरापासून लांब असल्याने नागरिकांना जाण्या येण्यासाठी गैरसोय होत होती. पालिकेच्यावतीने सोशल क्लब व प्रियदर्शनी इंदिरा गांधी मंगल कार्यालय या ठिकाणी लसीकरणाची सुविधा सुरू करता येऊ शकते, अशी सूचना मांडली. दोन्ही पैकी एक जागा निश्चित करण्यात येवून त्याठिकाणी लसीकरणाची सुविधा सुरू करू, असे नगराध्यक्षा आदिक यांनी सांगितले. यावेळी अधिकार्यांनी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांशी चर्चा करून शहरात लसीकरणासाठी दोन डॉक्टर व चार आरोग्य सेविका उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली. ग्रामीण रुग्णालयातील अधिकार्यांनी यास सकारात्मक ता दर्शवून लवकरच कर्मचारी व अधिकारी उपलब्ध करून दिले जातील, असे सांगितले.

अनुराधा आदिक, नगराध्यक्षा