राहुरी तालुक्यात एकाच दिवसात 304 करोनाग्रस्त

राहुरी तालुक्यात एकाच दिवसात 304 करोनाग्रस्त

राहुरी (प्रतिनिधी) - राहुरी तालुक्यात आज एकाच दिवसात करोनाग्रस्तांची संख्या त्रिशतकापार गेली आहे. गेल्या चार दिवसांपासून 200 च्या आतच करोनाबाधित आढळून आले होते. मात्र, आज करोनाच्या संख्येचा विक्रम झाला.

दरम्यान, दि. 1 मे पासून काल दि. 14 मे पर्यंत सुमारे 2 हजार 846 नागरिकांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर करोनाने राहुरी तालुक्यात पुन्हा उसळी मारली आहे. ग्रामीण भागातही करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यातच लसीकरणही ठप्प झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com