राहाता तालुक्यात 352 रूग्ण बरे होवून परतले घरी

302 करोनाबाधित रुग्ण; लोणी बुद्रुक 35, राहाता 84, शिर्डी-29
राहाता तालुक्यात 352 रूग्ण बरे होवून परतले घरी

राहाता (तालुका प्रतिनिधी) - राहाता तालुक्यात दिवसभरात करोनाची वाढती संख्या पहाता आज तालुक्यात 302 जण करोनाबाधित आढळून आले आहेत.

तालुक्यात एकूण 302 रुग्णांपैकी खासगी रुग्णालयात 44, खासगी रुग्णालयात 180 तर अँटीजन चाचणीत 78 रग्ण आढळून आले आहेत. तर 352 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. राहाता ग्रामीण 189, शिर्डी-22, राहाता शहर-84व शिर्डी-29, असे ग्रामीण व शहरी मिळून 302 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

अस्तगाव-14, पिंपरी निर्मळ-02, रांजणगाव-05, दाढ बुद्रुक-09, चंद्रपूर-04, लोणी बुद्रुक-35, लोणी खुर्द-05, डोर्‍हाळे-03, कनकुरी-03, नांदुर्खी बुदुक-03, कोर्‍हाळे-02, वाळकी-01, साकुरी-03, पिंपळस-02, आडगाव बुद्रुक-01, कोल्हार-07, भगवतीपूर-03, बाभळेश्‍वर बुद्रुक-08, तिसगाववाडी-01, पाथरे-04, हनुमंतगाव-03, लोहगाव-03, सावळीविहिर-07, सावळीविहिर खुर्द-01, रुई-04, पिंपळवाडी-07, शिंगवे-01, वाकडी-05, धनगरवाडी-04, चितळी-22, पुणतांबा़-11, नांदूर बुद्रुक-04, नपावाडी-02, असे ग्रामीण 189, तर शिर्डी-29, राहाता-84, शहरी व ग्रामीण मिळून एकूण-302 रुग्ण आढळून आले. गेल्या काही दिवसापासून तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या ही 200 च्यावर येत आहे. ती कमी होत नसल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसापासून जिल्हाधिकार्‍यांच्या कडक निर्बंधामुळे काही रुग्ण कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती मात्र तसे काहीही न झाल्यामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com