राहाता तालुक्यात करोनाचा कहर

जिल्ह्यात राहात्याचा दोन नंबर; 352 करोना रुग्ण
 राहाता तालुक्यात करोनाचा कहर

राहाता (तालुका प्रतिनिधी) -

राहाता तालुक्यात काल दिवसभरात करोनाने कहर केला आहे. काल तालुक्यात तबौबल 352 रुग्ण करोनाबाधित आढळून

आला आहे. आतापर्रंत 93 जणांचा करोनाने बळी गेला आहे. काल तालुक्यात सर्वाधिक रुग्ण लोणी खुर्दमध्ये 46, लोणी बुदुकमध्ये 40, शिर्डीत 30 तर चितळीत 20 असे रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यात करोनाबाधित रुग्णांमध्ये जिल्हा रुग्णालयात 84, खासगी रुग्णालयात 108 तर अँटीजन चाचणीत 160 असे एकूण तपासणीत 352 रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात 71 रुग्ण बरेच झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

राहाता तालुक्रातील रूग्णांचा आकडा कमी होताना दिसत नाही 24 तासात 352 जण करोना पॉझीटीव्ह सापडले असून त्रात तालुका -16 पैकी शिर्डी -30, राहाता-20, लोणी बुदुक -40, लोणी खुर्द -46, अस्तगाव -1, आडगाव -2, बाभळेश्‍वर -5, दाढ -6, केलवड-3, कोल्हार बुदुक -26, कनकुरी -3, नांदुखी बद्रुक -2, निमगाव -1, पुणतांबा -11, रांजणगांव-1, वाकडी -4, भगवतीपूर -6, चांगदेवनगर -1, चितळी -20, चंद्रपूर -1, नांदूर -1, निर्मळपिंपरी -7, रुई -12, साकुरी -2, दहेगाव -1, धनगरवाडी -1, रेलमवाडी -2, एकरुखे -1, गोगलगाव -1, हनुमंतगाव -3, हसनापूर -1, जळगाव -7, लोहगाव -3, ममदापूर -5, नपावाडी -2, पठारे -1, पिंपळस -5, पिंपळवाडी -4, प्रवरानगर -10, रांजणखोल -1, राजुरी -5, रामपूरवाडी -3, सावळीविहीर बुद्रुक -1, सावळीविहीर खु -3 असे रुग्ण आढळून आले आहेत.

तालुक्रातील सरकारी, साई संस्थान पिएमटी व सर्व खाजगी रूग्णालरात 1323 रूग्णांवर उपचार सुरू आहे. तालुक्यात 71 रुग्ण बरेच झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

लोणी खुर्द व बुदुकमध्ये सर्वाधिक 46 व 40असे रुग्ण आढळून आले आहेत. दोन दिवसापूर्वी तालुक्यातील चितळी येथे करोना चाचणी तपासणीचे शिबीर घेण्यात आले होते. यात 100 हून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली असता त्यात 20 रुग्ण करोनाबाधित आढळून आले. चितळी गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. या गावातून जाणारे सर्व रस्ते सील करण्यात आले असून गावातील करोना बचाव समितीच्यावतीने गावावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com