राहाता तालुक्यात 263 जणांना डिस्चार्ज

161 नवे करोनाबाधित; लोणी-13, चितळी-18, पुणतांबा-18
राहाता तालुक्यात 263 जणांना डिस्चार्ज

राहाता (प्रतिनिधी) - राहाता तालुक्यात आज पुन्हा करोनाने आपला चढता आलेख कायम ठेवला असून आज 161 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होवून घरी जाणार्‍यांचे प्रमाण कमी झाले आहे. आज 263 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 03 खासगी रुग्णालयात 125 तर अँटीजन चाचणीत 33 रग्ण आढळून आले आहेत. तर 263 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

तालुक्यात अस्तगाव-04, राजुरी-05, ममदापूर-01, पिंपरी निर्मळ-01, एकरुखे-04, रांजणगाव-02, दाढ बुद्रुक-01, लोणी बुद्रुक-13, गोगलगाव-06, लोणी खुर्द-06, डोर्‍हाळे-02, कोर्‍हाळे-02, केलवड बुदुक-10, साकुरी-01, आडगाव बुद्रुक-01, पिंपरी लौकाई-02, कोल्हार-13, भगवतीपूर-02, बाभळेश्‍वर बुद्रुक - 04, तिसगाववाडी-01, पाथरे-01, हनुमंतगाव-03, सावळीविहिरी बुदु्रक-01, निमगाव-02, रुई-02, शिंगवे-01, वाकडी-04, जळगाव-02, धनगरवाडी-01, चितळी-18, पुणतांबा-18, रांजणखोल-01, नांदूर बुद्रुक-05, असे ग्रामीण 140 रुग्ण, शिर्डी-09 राहाता-04, बाहेरील तालुक्यातील 4 असे एकूण 161 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा करोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे राहाता तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु करोनाबाधितांचा 200 ते 300 संख्येच्या दरम्यान असलेला आकडा कमी झाल्यास करोना आटोक्यात येवू शकेल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com