राहाता तालुक्यात 317 जणांना डिस्चार्ज

155 नवीन करोनाबाधित ; लोणी बुद्रुक-14, लोणी खुर्द-20
राहाता तालुक्यात 317 जणांना डिस्चार्ज

राहाता (प्रतिनिधी) - राहाता तालुक्यात काल पुन्हा करोनाने आपला चढता आलेख कायम ठेवला असून काल 155 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे होवून घरी जाणार्‍यांचे प्रमाण कमी झाले आहे. काल 317 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 52 खासगी रुग्णालयात 63 तर अँटीजन चाचणीत 40 रग्ण आढळून आले आहेत. तर 318 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तालुक्यात अस्तगाव-07, राजुरी-04, ममदापूर-02, पिंपरी निर्मळ-04, एकरुखे-01, रांजणगाव-03, दाढ बुद्रुक-03, दुर्गापूर-01, चंद्रापूर - 01, लोणी बुद्रुक-14, गोगलगाव-06, लोणी खुर्द-20, डोर्‍हाळे-03, केलवड बुदुक-09, साकुरी-03, पिंपळस-01, आडगाव बुद्रुक-01, कोल्हार-06, बाभळेश्‍वर बुद्रुक -01, पाथरे-02, हनुमंतगाव-06, लोहगाव-01, सावळीविहिरी बुदु्रक-01, वाकडी-14, एलमवाडी-02, चितळी-06, पुणतांबा-10, रांजणखोल-03, असे ग्रामीण 138 रुग्ण, शिर्डी-07 राहाता-05, बाहेरील तालुक्यातील 05 असे एकूण 155 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यात गेल्या महिनाभरापासून कमी अधिक असे 200 ते 400 च्या दरम्यान करोना बाधित रुग्णांचा आकडा राहिला आहे. मात्र काल 155 आकडा राहिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच 317 रुग्ण बरे होवून गेल्यामुळे बरे होणार्‍यांचे प्रमाणही चांगलेच राहिले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com