राहाता तालुक्यात करोनाचा उद्रेक सुरुच

401 करोनाबाधित रुग्ण; 311 बरे होवून घरी परतले
राहाता तालुक्यात करोनाचा उद्रेक सुरुच

राहाता (प्रतिनिधी) -

राहाता तालुक्यात करोनाचा उद्रेक सुरुच असून रोज 300 च्याखाली संख्या असलेल्या राहत्याने काल 400 चा आकडा ओलांडला आहे. काल तालुक्यात एकूण 401 रग्ण आढळून आले आहेत. त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 73, खासगी रुग्णालयात 151 तर अँटीजन चाचणीत 177 रग्ण आढळून आले आहेत.

तर 311 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.तालुक्यात सर्वाधिक राहाता शहरात 76, चितळीत 37 तर लोणी बुदुक 50 असे रुग्ण आढळून आले आहेत.

अस्तगाव-08, राजुरी-02, ममदापूर-03, पिंपरी निर्मळ-02, एकरुखे-01, रांजणगाव-01, दाढ बुद्रुक-14, हसनापूर-01, दुर्गापूर-03, चंद्रापूर-04, लोणी बुदु्रक-50, गोगलगाव-07, लोणी खुर्द-19, डोर्‍हाळे-11, कनकुरी-04, नांदुर्खी बद्रुक-08, केलवड बुद्रुक-03, साकुरी-02, दहेगाव-01, पिंपळस-01, कोल्हार-15, भगवतीपूर-04, बाभळेश्‍वर बुद्रुक-10, तिसगाववाडी-02, पाथरे-07,

हनुमंतगाव-04, लोहगाव-05, सावळीविहिर बुद्रुक-02, निमगाव-01, निघोज-01, रुई-10, पिंपळवाडी-02, शिंगवे-02, वाकडी-22, जळगाव-04, धनगरवाडी-05, एलमवाडी-04, चितळी-37, पुणतांबा-11, रांजणखोल-01, नांदुर बुदु्रुक-05, रामपूरवाडी-02, असे एकूण 308 ग्रामीण, शिर्डी-17, राहाता-76 असे शहर व तालुक्यात एकूण 401 रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या तालुक्यात तिनशेचा आकडा पार करत असलेल्या तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या 400 च्या पार गेल्याने चिंता खूपच वाढली आहे. चितळीत 37, लोणी बुद्रुक-50, या गावांमध्ये रुग्ण संख्या वाढली आहे. सध्या तालुक्यात लसीकरणाची व्यवस्था विविध ठिकाणी करावी लागणार आहे. काही ठिकाणी रेमडीसीवीर इंजेक्शन नसून त्या ठिकाणी रुग्ण संख्या अधिक आहेत. त्यामुळे रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांची चांगलीच दमछाक होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com