राहाता तालुक्यात 307 करोनाबाधित रुग्ण

राहाता शहर-70, चितळी 55 तर लोणी बुद्रुक-42
राहाता तालुक्यात 307 करोनाबाधित रुग्ण

राहाता (तालुका प्रतिनिधी) - राहाता तालुक्यात दिवसभरात करोनाची वाढती संख्या पहाता आज तालुक्यात 307 जण करोनाबाधित आढळून आले आहेत.

तालुक्यात एकूण 307 रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 69, खासगी रुग्णालयात 97 तर अँटीजन चाचणीत 141 रग्ण आढळून आले आहेत. तर 272 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. त रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात सर्वाधिक राहाता शहरात 70, चितळीत 55तर लोणी बुदुक 42 असे रुग्ण आढळून आले आहेत.

अस्तगाव-02, राजुरी-05, ममदापूर-01, पिंपरी निर्मळ-03, एकरुखे-02, रांजणगाव-04, दाढ बुदुक-09, दुर्गापूर-02, चंद्रापूर-02, लोणी बुद्रुक-42, गोगलगाव-05, लोणी खुर्द-13, कोर्‍हाळे-01, केलवड बुद्रक-06, साकुरी-02, दहेगाव-01, कोल्हार-14, भगवतीपूर-01, बाभळेश्‍वर बुद्रुक-09, तिसगाववाडी-02, पाथरे-03, लोहगाव-01, सावळीविहीर खुर्द-01, निमगाव-01, रुई-03, पिंपळवाडी-05, वाकडी-08, जळगाव-03, धनगरवाडी-03, एलमवाडी-01, चितळी-55, पुणतांबा-10, रांजणखोल-03, नांदूर बुद्रुक-01, रामपूरवाडी-03, असे एकूण राहाता ग्रामीणला 227, शिर्डी-10, राहाता 70 असे एकूण 307 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या तालुक्यात तिनशेचा आकडा पार करत असल्यामुळे तालुक्यातील करोनाबाधित संख्या वाढण्याची चिंता कायमच राहिली आहे. चितळीय सर्वाधिक 55 रुग्ण आढळले आहेत. त्यांना शिर्डी व श्रीरामपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत तर. त्या पाठोपाठ राहाता शहरात 70, लोणी बुद्रुक 42 असे रुग्ण आढळले आहेत. त्यात राहाता तालुक्यात सध्या ऑक्सीजन व रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असून त्यामुळे या रुग्णांवर व्यवस्थित उपचार केले जात नाही. त्यामुळे रुग्णांबरोबरच आता वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीही मेटाकुटीला आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com