राहाता तालुक्यात 284 रूग्ण बरे होवून परतले घरी

राहाता तालुक्यात 284 रूग्ण बरे होवून परतले घरी

302 करोनाबाधित रुग्ण; लोणी बुद्रुक 39, राहाता 84,चितळी-31

राहाता (तालुका प्रतिनिधी) -

राहाता तालुक्यात दिवसभरात करोनाची वाढती संख्या पहाता काल तालुक्यात 302 जण करोनाबाधित आढळून आले आहेत.

तालुक्यात एकूण 302 रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 43, खासगी रुग्णालयात 107 तर अँटीजन चाचणीत 152 रग्ण आढळून आले आहेत. तर 284 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. राहाता ग्रामीण 211, शिर्डी-18, राहाता शहर-73 असे 302 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

अस्तगाव-02, तरकसवाडी-02, पिंपरी निर्मळ-02, राजुरी-03, एकरुखे-01, रांजणगाव-02, दाढ बुद्रुक-04, हसनापूर-01, दुर्गापूर-01, लोणी बुद्रुक-39, गोगलगाव-02, लोणी खुर्द-19, डोर्‍हाळे-02, कनकुरी-1, नांदुर्खी बुदुक-03, केलवड बुदुक-03, साकुरी-07, दहेगाव-03, खडकेवाके-01, पिंपळस-07, कोल्हार-10, भगवतीपूर-06, बाभळेश्‍वर बुद्रुक-02, तिसगाववाडी-03, पाथरे-03, हनुमंतगाव-02, सावळीविहिर बुद्रुक-03, निमगाव-02, निघोज-03, रुई-02, पिंपळवाडी-03, वाकडी-14, जळगाव-04, धनगरवाडी-03, चितळी-31, पुणतांबा-07, रांजणखोल-05, नांदुर बुदुक-01, रामपूरवाडी-02 असे ग्रामीण 211, तर शिर्डी-18, राहाता-73, शहरी व ग्रामीण मिळून एकूण-302 रुग्ण आढळून आले.

सध्या तालुक्यात तिनशेचा आकडा पार करत असल्यामुळे तालुक्यातील करोनाबाधित संख्या वाढण्याची चिंता कायमच राहिली आहे. सध्या ऑक्सीजन व रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असून त्यामुळे या रुग्णांवर व्यवस्थित उपचार केले जात नाही. त्यामुळे रुग्णांबरोबरच आता वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीही मेटाकुटीला आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com