<p><strong>नेवासा (का. प्रतिनिधी) - </strong> </p><p>नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथे काल सोमवारी तिघे करोना संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या </p>.<p>2939 झाली आहे. तालुक्यात आठवडाभरात एकूण 9 संक्रमित आढळून आले आहेत.नेवासा तालुक्यात करोना संक्रमितांच्या नवीन बाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 7 व 10 जानेवारीला तालुक्यात एकही संक्रमित आढळून आला नाही. पाच जानेवारीला सलाबतपूर येथे एक, 6 जानेवारीला बर्हाणपूर येथे एक, 8 जानेवारीला घोडेगाव व जेऊर येथे प्रत्येकी एक, 9 तारखेला घोडेगाव येथे एक तर 11 तारखेला सौंदाळा येथे तिघे करोना संक्रमित आढळून आले. अशाप्रकारे आठवडाभरात 6 गावांत मिळून 9 संक्रमित आढळून आले.</p>