<p><strong>नेवासा (का. प्रतिनिधी) - </strong></p><p>नेवासा तालुक्यात तीन दिवसांत 6 संक्रमित आढळून आले. काल गुरुवारी तालुक्यात एकही संक्रमित आढळून आला नाही. </p>.<p>तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या 2921 झाली आहे. मंगळावरी सोनई, घोडेगाव, भेंडा खुर्द येथे प्रत्येकी एक असे तिघे संक्रमित आढळून आले होते. बुधवारी माका येथे एक तर घोडेगाव येथे दोन असे तिघे संक्रमित आढळले. काल गुरुवारी तालुक्यात एकही संक्रमित आढळून आला नाही.अशाप्रकारे मागील तीन दिवसात तालुक्यातील पाच गावातून केवळ सहा करोनाबाधित आढळून आले आहेत.</p>