नेवासा तालुक्यात 62 गावांतून आढळले 185 संक्रमित

कुकाणा केंद्र 40, सोनई 26, चांदा 25, टोका 24, नेवासा खुर्द 22, सलाबतपूर 19, शिरसगाव 12, नेवासा बुद्रुक 11, उस्थळदुमाला 6
नेवासा तालुक्यात 62 गावांतून आढळले 185 संक्रमित

नेवासा (का. प्रतिनिधी) - नेवासा तालुक्यातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 62 गावांतून काल रविवारी 185 करोना संक्रमित आढळून आले. सर्वाधिक संक्रमित कुकाणा केंद्रांतर्गत गावात (40) तर सर्वात कमी (6) बाधित उस्थळदुमाला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत आढळून आले.

कुकाणा केंद्रांतर्गत 12 गावांतून 40 बाधित आढळले. त्यामध्ये भेंडा बुद्रुक येथे 9, भेंडा खुर्द येथे 6, कुकाणा व तरवडी येथे प्रत्येकी 5, देवगाव व सौंदाळा येथे प्रत्येकी 3, चिलेखनवाडी, जेऊरहैबती व देडगाव येथे प्रत्येकी 2 तर शहापूर, सुकळी व तेलकुडगाव येथे प्रत्येकी 1 असे बाधित आढळले.

सोनई केंद्रांतर्गत 8 गावातून 26 बाधित आढळले. त्यामध्ये सोनईत 11, वंजारवाडी, झापवाडी, शिंगणापूर व पानसवाडी या चार गावातून प्रत्येकी तिघे, लोहगाव, करजगाव व बेल्हेकरवाडी येथील प्रत्येकी एकजण बाधित आढळला.

चांदा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 9 गावांतून 25 बाधित आढळले. कांगोणी येथील 7, महालक्ष्मीहिवरे येथील 6, चांदा येथे 5, पाचुंदा येथे 2 तर घोडेगाव, शिंगवेतुकाई, लोहारवाडी, रस्तापूर व बर्‍हाणपूर येथे प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला.

टोका प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 8 गावातून 24 बाधित आढळले. त्यात खडका येथे 8, भानसहिवरा येथे 6, खलालपिंप्री येथे 3, बकुपिंपळगाव व मुरमे येथे प्रत्येकी दोन तर जळके बुद्रुक, बाभुळखेडा व मक्तापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. नेवासा खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 5 गावातून 22 बाधित आढळले. सर्वाधिक 16 नेवासा खुर्द येथे आढळले. तामसवाडी व निंभारी येथे प्रत्येकी दोघे तर सजलपूर व अमळनेर येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळला.

सलाबतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 6 गावांतून 19 बाधित आढळले. पिचडगाव येथे 8 बाधि आढळले. मुकिंदपूर येथे 5, म्हसले येथे 3, गोंडेगाव, गिडेगाव व दिघी येथील प्रत्येकी एकजण बाधित आढळला.

शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 6 गावातून 12 बाधित आढळले. शिरसगाव येथे 5, सुलतानपूर व वाकडी येथे प्रत्येकी दोघे तर वरखेड, नजिकचिंचोली व खामगाव येथे प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला.

नेवासा बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चार गावातून 11 बाधित आढळले. बेलपिंपळगाव येथे सर्वाधिक 6 बाधित आढळले. जैनपूर येथे तिघे तर घोगरगाव व उस्थळखालसा येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळला.

उस्थळदुमाला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चार गावातून सहाजण बाधित आढळले. त्यात रांजणगाव येथे सर्वाधिक तिघे तर खरवंडी, सांगवी व मोरेचिंचोरा येथे प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला.

अशाप्रकारे 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 62 गावांतून काल 185 संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 11 हजार 706 झाली आहे.

Related Stories

No stories found.