नेवासा : 37 गावांतून 122 संक्रमित

नेवासाफाटा येथे सर्वाधिक 25 बाधित
नेवासा : 37 गावांतून 122 संक्रमित

नेवासा (का. प्रतिनिधी) - नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर (नेवासाफाटा) येथे आज सर्वाधिक 25 संक्रमित तर नेवासा शहरात 18 संक्रमित आढळून आले असून आज 37 गावांतून 122 संक्रमित आढळले.

घोडेगाव येथे 8, सोनईत 7, घोगरगाव येथे 6 तर वडाळा बहिरोबा येथे 5 संक्रमित आढळून आले.

शिरसगाव, देवगाव व भेंडा खुर्द येथे प्रत्येकी चौघे बाधित आढळले. कुकाणा व सलाबतपूर येथे प्रत्येकी तिघे बाधित आढळले.

शिंगवेतुकाई, महालक्ष्मीहिवरे, माका, वांजोळी, उस्थळदुमाला, माळेवाडीखालसा, माळीचिंचोरा, हंडीनिमगाव व भानसहिवरे या 9 गावात प्रत्येकी दोघे बाधित आढळले.

झापवाडी, सांगवी, रस्तापूर, पिंप्रीशहाली, पानसवाडी, करजगाव, पानेगाव, निपानीनिमगाव, पाचुंदा, जळकेखुर्द, हिंगोणी, गोंडेगाव, गोगलगाव, बेलपिंपळगाव, धनगरवाडी व अंमळनेर या 16 गावातून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला.

अशाप्रकारे 37 गावांतून 122 संक्रमित आढळले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 8 हजार 997 झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com