नेवासा तालुक्यात एकाच दिवशी उच्चांकी 240 बाधित

नेवासा तालुक्यात एकाच दिवशी उच्चांकी 240 बाधित

छोट्याशा बेलपांढरीत आढळले 22 बाधित

नेवासा (का. प्रतिनिधी) -

नेवासा तालुक्यात आज एका दिवसातील करोना संक्रमितांची उच्चांकी संख्या गाठली गेली. आज 65 गावांतून 240 संक्रमित आढळले. एकाच दिवसातील संक्रमितांच्या संख्येचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

आज शनिवारी सोनईत सर्वाधिक 29 संक्रमित आढळून आले. त्याखालोखाल घोडेगाव येथे 25 बाधित आढळले. बेलपांढरी येथे 22, भेंडा बुद्रुक येथे 20, नेवासा शहरात (नेवासा खुर्द) 19, नेवासा बुद्रुकमध्ये 18 संक्रमित आढळून आले.

भानसहिवरा व भेंडा खुर्द येथे प्रत्येकी 5 तर बाभुळखेडा, खरवंडी व सुरेगाव येथे प्रत्येकी चार बाधित आढळले.

बहिरवाडी, भालगाव, देवगाव, गणेशवाडी, हंडीनिमगाव, जैनपूर, पाचेगाव, रांजणगाव, उस्थळदुमाला व वडाळाबहिरोबा या 10 गावांतून प्रत्येकी तिघे बाधित आढळले.

तामसवाडी, शिरेगाव, नांदूरशिकारी, मुरमे, मुकिंदपूर, मंगळापूर, माका, लोहगाव, करजगाव, जेऊरहैबती व अंतरवाली या 11 गावांतून प्रत्येकी दोघे बाधित आढळले.

वरखेड, वांजोळी, वाकडी, वडुले, उस्थळखालसा, तेलकुडगाव, तरवडी, शिंगवेतुकाई, रस्तापूर, राजेगाव, प्रवरासंगम, पिचडगाव, पाथरवाला, पानेगाव, पानसवाडी, निंभारी, नजिकचिंचोली, म्हाळसपिंपळगाव, मांडेगव्हाण, लोहारवाडी, लांडेवाडी, कुकाणा,खुणेगाव, खेडलेपरमानंद, खडका, हिंगोणी, गोणेगाव,गिडेगाव, गेवराई,देवसडे, देडगाव, चांदा व गोंडेगाव या 33 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला.

अशाप्रकारे 65 गावांतून आज 240 संक्रमित आढळल्याने तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 5 हजार 910 झाली आहे.

6 गावांमधून 113 संक्रमित

नेवासा तालुक्यात आज केवळ 6 गावांतूनच 113 संक्रमित आढळून आले. सोनई (29), घोडेगाव (25), बेलपांढरी (22), भेंडा बुद्रुक (20), नेवासा खुर्द (19) व नेवासा बुद्रुक (18) या 6 गावांत दोन अंकी संख्येने बाधित आढळले. दोन गावांमध्ये प्रत्येकी 5, तीन गावांत प्रत्येकी 4, दहा गावांमध्ये प्रत्येकी तीन, 11 गावांमध्ये प्रत्येकी 2 तर 33 गावांमधून प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com