नेवासा : 36 गावांतून आढळले 93 संक्रमित

नेवासा शहरात नव्याने 18 तर चांद्यात 8 संक्रमित
नेवासा : 36 गावांतून आढळले 93 संक्रमित

नेवासा (का. प्रतिनिधी) -

नेवासा तालुक्यात काल 36 गावांतून 93 करोना संक्रमित आढळून आले. सलग तिसर्‍या दिवशी सर्वाधिक बाधितांमध्ये

नेवासा शहर पहिल्या स्थानावर असून नेवासा शहरात काल शनिवारी 18 संक्रमित आढळून आले तर त्या खालोखाल चांदा येथे 8 संक्रमित आढळले.

भेंडा बुद्रुक येथे 7 तर भानसहिवरा व घोडेगाव येथे प्रत्येकी 6 संक्रमित आढळून आले. मुकिंदपूर येथे चौघे संक्रमित आढळून आले. सोनई, मक्तापूर, नेवासा बुद्रुक व प्रवरासंगम या 4 गावांतून प्रत्येकी तिघे संक्रमित आढळले.

टोका, तेलकुडगाव, कौठा, उस्थळदुमाला, सलाबतपूर व अमळनेर या 6 गावांतून प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले.

तरवडी, साईनाथनगर, पाचेगाव, मंगळापूर, खलालपिंप्री, माळीचिंचोरा, रांजणगाव, कुकाणा, करजगाव, जेऊरहैबती, गोगलगाव, जैनपूर, गेवराई, खरवंडी, गळनिंब, दिघी, बाभुळखेडा, अंतरवाली, सुलतानपूर व शिरसगाव या 20 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला. अशाप्रकारे काल 36 गावांतून 93 संक्रमित आढळून आले. तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 4 हजार 826 झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com