नेवासा : आज ‘इतके’ करोनाग्रस्त

नेवासा शहर, बुद्रुक व फाटा मिळून वाढले 45 संक्रमित
नेवासा : आज ‘इतके’ करोनाग्रस्त

नेवासा (का. प्रतिनिधी) -

नेवासा तालुक्याने काल एकाच दिवसात करोना संक्रमितांचे दीड शतक ओलांडले. काल 44 गावांतून 151 संक्रमित आढळून आले. सर्वाधिक 29 संक्रमित नेवासा शहरात तर त्या खालोखाल 14 संक्रमित घोडेगावात आढळले. तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 4 हजार 733 झाली आहे.

नेवासा शहरातील संक्रमितांची संख्या दररोज वाढत आहे. गुरुवारी 28 संक्रमित आढळल्यानंतर काल शुक्रवारी 29 संक्रमित आढळले. घोडेगाव येथे 14 बाधित आढळले. मुकिंदपूर (नेवासाफाटा) येथे 9 बाधित आढळले तर सलाबतपूर येथे 8 बाधित आढळून आले. नेवासा बुद्रुक येथे 7 संक्रमित आढळले. नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक व नेवासाफाटा मिळून काल 45 संक्रमित आढळले.

खरवंडी येथे 6 संक्रमित आढळले. कुकाणा व बाभुळवेढा येथे प्रत्येकी 5 बाधित आढळून आले. चांदा, खडका, गोधेगाव, जैनपूर या चार गावात प्रत्येकी चौघे बाधित आढळले.

पुनतगाव, सोनई, रांजणगाव, वडाळा बहिरोबा, उस्थळदुमाला, व भानसहिवरा या 6 गावांतून प्रत्येकी तिघे संक्रमित आढळले.

शिरसगाव, सुलतानपूर, निंभारी, म्हाळसपिंपळगाव, बर्‍हाणपूर व भेंडा बुद्रुक या 6 गावांतून प्रत्येकी दोघे बाधित आढळले.

राजेगाव, प्रवरासंगम, पिंप्रीशहाली, पाथरवाला, निपानीनिमगाव, माका, सुरेगाव, खामगाव, टोका, खलालपिंप्री, कांगोणी, शिंगणापूर, हिंगोणी, गोणेगाव, धामोरी, बेलपिंपळगाव व अमळनेर या 17 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला. अशाप्रकारे 44 गावांतून 151 करोना संक्रमित आढळून आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com