नेवासा तालुक्यातील 31 गावांतून आढळले 131 संक्रमित

नेवासा तालुक्यातील 31 गावांतून आढळले 131 संक्रमित

नेवासा शहरात नव्याने 26 बाधित

नेवासा (का. प्रतिनिधी) - नेवासा तालुक्यातील 31 गावांतून काल 131 करोना संक्रमित आढळून आल्याची माहिती तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सुर्यवंशी यांनी दिली.

नेवासा शहरात (नेवासा खुर्द) काल 26 संक्रमित आढळले. माळीचिंचोरे व खरवंडी येथे प्रत्येकी 9 तर नारायणवाडी येथे 8 संक्रमित आढळले. घोडेगाव व उस्थळदुमाला येथे प्रत्येकी 7 जण बाधित आढळले. अमळनेर व खडका येथे प्रत्येकी 6 जण तर हंडीनिमगाव येथे पाचजण बाधित आढळले.

मुकिंदपूर, वडाळा बहिरोबा, निंभारी, रांजणगाव, शिंगणापूर या पाच गावात प्रत्येकी चौघे बाधित आढळले. कुकाणा व सोनईत प्रत्येकी तिघे संक्रमित आढळले. बाभुळवेढा, गेवराई, मक्तापूर, जैनपूर, नेवासा बुद्रुक व शिंगवेतुकाई या 6 गावात प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले.

वरखेड, टोका, सुरेशनगर, म्हाळसपिंपळगाव, हनुमानवाडी,गोंडेगाव, गणेशवाडी, चांदा, भेंडा बुद्रुक व भानसहिवरा या 10 गावांमध्ये प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला. अशाप्रकारे तालुक्यातील 31 गावांतून 131 जण संक्रमित आढळल्याने तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 4582 झाली आहे.

अ‍ॅन्टीजेन : सोनईत आढळले 63 संक्रमित

सोनई (वार्ताहर) - काल गुरुवारी सोनई येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्या मागणीनंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या रॅपिड अ‍ॅन्टीजेन तपासणीत परीसरातील 63 व्यक्ती संक्रमित आढळल्या असून यात सोनई गावातील तब्बल 31 जणांचा समावेश आहे.

करोना संसर्गाची वाढती स्थिती लक्षात घेवून सोनईचे सरपंच धनंजय वाघ व ग्रामसमितीने सुचना केल्यानंतर सेवा सोसायटीच्या शॉपींग कॉम्प्लेक्स मध्ये बसस्थानक परीसरातील 84 व्यावसायिकांची तपासणी करण्यात आली असता 3 जण पॉझिटिव्ह आले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आलेल्या 252 जणांच्या तपासणीत 63 पॉझिटिव्ह निघाले. पैकी 31 सोनई गावातील आहेत.

एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्या नंतर ग्रामस्थांनी सलग आठ दिवस जनता कर्फ्यू करण्याची मागणी केली. याबाबत अनेकांनी जिल्हा परिषद अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनिल गडाख यांच्याशी संपर्क करुन चिंता व्यक्त केली. ग्रामसमितीची तातडीची बैठक घेवून आवश्यक बाबीचा विचार करण्यात आला.

बैठकीस सरपंच धनंजय वाघ, उपसरपंच प्रसाद हारकाळे, सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे, पत्रकार विनायक दरंदले, आरोग्य सहायक रमेश जावळे, डॉ.स्मिता चेके, कामगार तलाठी दिलीप जायभाय, ग्रामसेवक बटुळे, माजी सरपंच दादासाहेब वैरागर, माजी उपसरपंच संदीप कुसळकर सह सर्व विद्यमान सदस्य उपस्थित होते. बैठकीत कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. सोमवार दि.19 एप्रिल ते सोमवार 26 एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यू करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com