नेवासा : 26 गावांतून 46 संक्रमित

भानसहिवरेत आणखी 10 बाधित
नेवासा : 26 गावांतून 46 संक्रमित

नेवासा (का. प्रतिनिधी) -

नेवासा तालुक्यात काल बुधवारी 26 गावांतून 46 करोना संक्रमित आढळून आले. मंगळवारी भानसहिवरेत 18 संक्रमित

आढळल्यानंतर काल दुसर्‍या दिवशी आणखी 10 संक्रमित आढळून आले.

खडका येथे 5 संक्रमित आढळले. मुकिंदपूर व हंडीनिमगाव येथे प्रत्येकी तिघे बाधित आढळले. सौंदाळा, पिचडगाव व राजेगाव येथे प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले.

खलालपिंप्री, कांगोणी, जेऊरहैबती, वाटापूर, वडाळा बहिरोबा, उस्थळदुमाला, प्रवरासंगम, खरवंडी, कुकाणा, मक्तापूर, नेवासा शहर, सलाबतपूर, गेवराई, गळनिंब, देडगाव, घोडेगाव, बेलपिंपळगाव, भेंडा बुद्रुक व अंतरवाली या 19 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला. तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या 4451 झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com