नेवासा : शहरात 40 तर भानसहिवरेत 18 संक्रमित

नेवासा : शहरात 40 तर भानसहिवरेत 18 संक्रमित

नेवासा (का. प्रतिनिधी) -

नेवासा तालुक्यात करोना बाधितांच्या एका दिवसातील संख्येने काल गुढीपाडव्याच्या दिवशी नवा उच्चांक केला असून

प्रथमच शतक ओलांडले. काल 30 गावांतून 114 संक्रमित आढळून आले.

नेवासा शहरात (नेवासा खुर्द) काल विक्रमी 40 संक्रमित आढळले. नेवासाफाटा (मुकिंदपूर) येथे 3 तर जवळच असलेल्या भानसहिवरे येथे 18 संक्रमित आढळले. नेवासा बुद्रुक व खडका येथे प्रत्येकी 5 बाधित आढळले. असे नेवासा शहर परिसरातच 71 संक्रमित आढळले.

पिंप्रीशहाली व भेंडा बुद्रुक येथे प्रत्येकी चौघे बाधित आढळले. घोडेगाव, शिंगणापूर, टोका व उस्थळखालसा येथे प्रत्येकी तिघे बाधित आढळले.

तेलकुडगाव, रस्तापूर, खरवंडी व बकुपिंपळगाव या चार गावात प्रत्येकी दोघे बाधित आढळले.

शिरसगाव, भालगाव, सोनई, तरवडी, शिंगवेतुकाई, नजिकचिंचोली, शहापूर, प्रवरासंगम, कुकाणा, हंडीनिमगाव, मक्तापूर, दिघी, गोणेगाव, चिलेखनवाडी व बेलपांढरी या 15 गावातून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला.

अशाप्रकारे 30 गावातून 114 बाधित आढळले असून एकूण संक्रमितांची संख्या 4405 झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com