कोपरगाव तालुक्यात 182 करोना बाधित

कोपरगाव तालुक्यात 182 करोना बाधित

तिघांचा मृत्यू

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) -

कोपरगाव शहरासह तालुक्यात 16 एप्रिल रोजी सापडलेल्या 130 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात 113 तर खासगी लॅब मधील 48 तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 21 असे 182 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. तर तालुक्यातील हांडेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, सोनारी येथील 60 वर्षीय पुरुष तर कोपरगाव येथील 45 वर्षीय पुरुष या तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे शनिवारी दिवसभरात एकूण 182 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यात शहरातील 9, ओम नगर येथील 2, समता नगर येथील 1, लक्ष्मी नगर येथील 1, साईधाम येथील 1, गोरोबा नगर येथील 2, खडकी येथील 1, श्रद्धा नगरी येथील 2, महावीर पथ येथील 3, द्वारका नगरी येथील 2, स्वामी समर्थ नगर येथील 2, सुभद्रा नगर येथील 2, निवारा येथील 2, सरोदे वस्ती येथील 1, येवला रोड येथील 2, मोहिनीराज नगर येथील 3, कालिका नगर येथील 1, साईनगर येथील 1, गवारे नगर येथील 1, आढाव वस्ती येथील 1, इंदिरापार्क येथील 1, धारणगाव रोड येथील 1, ब्राम्हण गल्ली येथील 2, शिवाजी रोड येथील 1, येवला रोड येथील 2, कोजागिरी कॉलनी येथील 2, टिळक नगर येथील 1, इंदिरा पथ येथील 1, साईसिटी येथील 1 तर ग्रामीण मधील मूर्शतपूर येथील 6, धारणगाव येथील 1, जेऊर कुंभारी येथील 2, कोकमठाण येथील 5, टाकळी येथील 5, ब्राम्हणगाव येथील 4, शिंगणापूर येथील 3, तीन चारी येथील 1, रवंदे येथील 6, माहेगाव देशमुख येथील 6, कोळपेवाडी येथील 6, आंचलगाव येथील 1, येसगाव येथील 3, वारी येथील 6, खोपडी येथील 2, भोजडे येथील 2, कुंभारी येथील 1, सोनेवाडी येथील 1, घारी येथील 2, संवत्सर येथील 12, करंजी येथील 6, हांडेवाडी येथील 4, सुरेगाव येथील 3, मंजूर येथील 3, बक्तरपूर येथील 5, कारवाडी येथील 1, धामोरी येथील 1, सांगावी भुसार येथील 3, वेळापूर येथील 3, चासनळी येथील 2, दहेगाव बोलका येथील 7, आपेगाव येथील 1, देर्डे कोर्‍हाळे येथील 1, मायगाव देवी येथील 1, पोहेगाव येथील 3, मळेगाव थडी येथील 1, जेऊर पाटोदा येथील 1, मढी बु येथील 1, साकरवाडी येथील 1, पढेगाव येथील 1, खिर्डी गणेश येथील 2, चांदेकासारे येथील 2, शहाजापूर येथील 1 असे 182 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे.

कोपरगाव तालुक्यात 17 एप्रिल पर्यंत 7 हजार 85 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून पाच हजार 796 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 1207 अ‍ॅक्टिव्ह पेशंट आहे तर आज पर्यंत 30 हजार 319 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांचे प्रमाण 22.08 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.11 टक्के असे आहे. तर 78 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com