<p><strong>कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) - </strong></p><p>कोपरगाव शहरासह तालुक्यात 11 डिसेंबर रोजी सापडलेल्या 5 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 52 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली </p>.<p>त्यात 10 तर अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 4 असे ऐकून 14 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसात एकूण 14 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यात शहरातील शिंदे शिंगी नगर येथील 1, इंदिरा पथ येथील 2 तर तालुक्यातील तीन चार येथील 2, सुरेगाव येथील 5, नाटेगाव येथील 1,कोकमठाण येथील 3 असे 14 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे.तालुक्यात आज 12 डिसेंबर पर्यंत 2 हजार 567 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून दोन हजार 454 रुग्ण बरे झाले आहे. 18 हजार 71 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.</p>